Ad will apear here
Next
‘पालकांनी शाळेशी आर्थिक व्यवहार केल्यास पावती मागावी’
पाटील विद्यालयाच्या पालक-शिक्षक सभेत मुख्याध्यापकांचे आवाहन
सोलापूर : ‘पालकांनी प्रशालेत कोणतेही आर्थिक व्यवहार केले, तर पावतीची मागणी करावी. पावतीशिवाय आम्ही कसलेही शुल्क आकारात नाही. त्यामुळे पालकांनी काळजी करू नये,’ असे रोपळे (ता. पंढरपूर) येथील रयत शिक्षण संस्थेच्या पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक बिभीषण पाटील यांनी सांगितले. 

पाटील विद्यालयाची पालक शिक्षक सहविचार सभा नुकतीच घेण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी सज्जन भोसले होते. या वेळी व्यासपीठावर सुप्रभात ग्रुपचे संचालक बाळासाहेब भोसले, किशोर काकडे, माजी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष जनक भोसले उपस्थित होते. या सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये पालक मोहन काळे यांनी जादा तुकड्यांना मान्यता मिळवणे, नियमाप्रमाणे शालेय पोषण आहाराची व्यवस्था करणे, स्वच्छतागृह व शालेय परिसर स्वच्छता, गुरुकुल प्रकल्पाला शिक्षकांनी वेळेत उपस्थित राहण्याची मागणी करून स्पर्धा परीक्षा व स्कॉलरशीप परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थांची विषेश तयारी करून घेण्याची मागणी केली. 

या सभेत विद्यार्थी व शिक्षकांना ड्रेसकोडची सक्ती करण्यात आली. यावर मुख्याध्यापक पाटील यांनी यातील काही विषय मार्गी लागले असून, जादा तुकड्या सुरू करण्याबद्दल गावकऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. दादासाहेब लोखंडे यांनी शाळेच्या समोरून गेलेल्या विजेच्या तारा धोकादायक झाल्यामुळे त्यापासून संरक्षण करण्याच्या उपाययोजना करण्याची मागणी केली. नवीन निवड झालेल्या पालक शिक्षक संघ व गुरूकुल पालक शिक्षक संघाच्या नवनिर्वाचीत सदस्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सोमनाथ जगताप यांनी आभार मानले. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EZFYCB
Similar Posts
‘मराठी खोली’मुळे होतोय शुद्ध बोलण्याचा प्रयत्न सोलापूर : मराठी भाषा संवर्धनासाठी सोलापूर जिल्ह्यातील रोपळे (ता. पंढरपूर) येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री. शि. बा. पाटील विद्यालयात मराठी भाषा खोलीचा एक वेगळा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या खोलीमुळे विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषा शुद्ध बोलण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.
पाटील विद्यालयात विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन सोलापूर : पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथील रयत शिक्षण संस्थेच्या पाटील विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
चंद्रकांत मलपे यांच्या शोधनिबंधास राष्ट्रीय पुरस्कार सोलापूर : पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री. शिवाजीभाऊ बाबा पाटील विद्यालयातील रयत सेवक चंद्रकांत सीताराम मलपे यांच्या शोधनिबंधास राष्ट्रीय पातळीवरील ‘अॅवॉर्ड ऑफ मेरीट’ हा पुरस्कार मिळाला. गुजरात राज्यातील अहमदाबाद शहरात नुकतीच नववी राष्ट्रीय टीचर्स सायन्स काँग्रेस पार पडली.
गांधी विचार परीक्षेचा निकाल जाहीर सोलापूर : जळगाव येथील गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे घेतलेल्या गांधी विचार संस्कार परीक्षेचा जिल्हास्तरीय निकाल जाहीर झाला असून, यात रोपळे (ता. पंढरपूर) येथील पाटील विद्यालयातील दहावीची विद्यार्थिनी चैताली धोंडीराम भोसले हिने या परिक्षेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language